हरि माझे मन तुझे झाले
हरि माझे मन तुझे झाले
न्याहाळता तुझे रूप
नयनी अश्रू रे दाटले,
किती मूख ते देखणे
ज्यात ब्रह्मांड साठले।।
दंग झाले माझे मन
तुझ्या लीला रे पाहून,
गेल्या प्रेमाच्या वर्षावात
गवळणी सर्वांगी न्हाउन।।
सृष्टीचा तू पालनकर्ता
नसे सीमा तुझ्या दिव्या,
बाललीला तुझ्या नटखट
बांधीते मी पंक्ति काव्या।।
तूच निर्मितीचा झरा
साऱ्या जगाचा चालक,
मी रे पामर चरणी
तूच सर्वांचा मालक।।
जन्मदिन कन्हैया तुझा
आला सर्वांगा शहारा,
वासुदेव कसे गेले
सारा तोडुनी पहारा।।
यशोदेचा तु रे पुत्र
देवकी तुझी माता,
वासुदेव तुला रक्षी
नंदराजाचा तु भाग्यदाता।।
तुझ्या नावाचा रे आधी
तू राधेला भाग्य दिले,
किती प्रेमळ तू हरी
माझे मन तुझे झाले।।
