शिक्षणाचे दीपस्तंभ
शिक्षणाचे दीपस्तंभ
सावित्री शिक्षणाची ज्योत
फुले ज्योतीबांनी पेटविली,
करुनी दारीद्रयावर मात
राधाकृष्णनने विद्वत्ता वाढविली।।
झुगारून रूढी,परंपरा ब
लेक जाचातून सोडविली,
लग्नानंतर शिकवून पत्नी
पहिली शिक्षिका घडविली।।
अभिमान असे शिक्षकांचा
राष्ट्रपती पदकाला खेटला,
विचारवंत सर्वपल्ली राधाकृष्णन
भारतरत्न पुरस्कार भेटला ।।
भिडे वाड्यात मुलींची
पहिली शाळा सुरू केली,
पत्करून समाजाचा विरोध
लेखणी मुलींच्या हाती दिली।।
गरीबीत जरी जन्मला
नाही अवमान वाटला,
विद्वत्तेचे घेऊन बाळकडू
वसा शिक्षणाचा घेतला।।
सती-स्त्री बालहत्याचा
मोडून काढला डाव ,
विधवा पुनर्विवाह लावूनी
जुन्या रुढी वर केला घाव।।
विवेकानंद अन सावरकर
आदर्श दोन घेतले शिरी ,
भाषण लेखन जोरावर
देशभक्ति जपली उरी ।।
घेऊनी यशवंताला दत्तक
नवा इतिहास घडविला,
सत्यशोधक समाज स्थापून
महिला,दलित अत्याचार अडविला।
स्वातंत्र्यानंतर होऊन राजदूत
संविधानाचा वाढवला मान,
हात लढा देऊन चीन-पाकिस्तान
कायम राखीला देशाचा अभिमान ।।
धन्य सावित्री अन फुले
देशकार्या अर्पिले जीवन,
शिक्षकाने सांभाळून देशा
गुरुपदाला केले पावन।।
