STORYMIRROR

Jaishri Autade

Others

4  

Jaishri Autade

Others

थोड़ी शाळा शिकु दे........

थोड़ी शाळा शिकु दे........

1 min
514

नको सागराची माया

नको आभाळ शिवाया,

फक्त जाऊ दे ग मला

थोड़ी शाळा शिकाया।।


थोड़ शिकीन लिहाया

थोड़ शिकीन वाचाया ,

शिक्षणानं मी ग आई

थोड़ शिकीन जगाया।।


गणित शिकीन सोड़ाया

इंलिश बोलाया, लिव्हाया,

वादळ ग मोठी मोठी

मी शिकीन पेलाया,


भाउसंग मी जाईन

त्याच्या सोबत राहीन,

नको घाबरु तू आई

घरी काम बी करिन।।


दोन राहीन घरात

शोभा वाढविल अंगणात

जन्म लेकिचा घेतला 

म्हणून नको मारू उदरात।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन