कोरोना लस
कोरोना लस
आली आलीया कोरोना लस
जी देईल तुम्हा सुरक्षा खास ||धृ||
कोरोनानं केलं आपल्याला बेजार
केवळ लसीनंच जाणार हा आजार
म्हणून उगाच करू नका चिंता
शास्त्रज्ञाने सोडवला हा लसीने गुंता
आली आलीया कोरोना लस
जी देईल तुम्हा सुरक्षा खास ||१||
घेतल्यानंतर लस होईल थोडी परेशानी
पण त्यानेच तर होणार कोरोनाची हानी
लसीनेच वाचेल तुमचा जीव
त्याशिवाय कोरोनाला नाही कीव
आली आलीया कोरोना लस
जी देईल तुम्हा सुरक्षा खास ||२||
नको अफवा पसरू
नको कोरोना लस घेण्यास विसरू
म्हणून करा कोरोना लसीकरण
नाही होणार मग त्याने मरण
आली आलीया कोरोना लस
जी देईल तुम्हा सुरक्षा खास ||३||
लस घेतली जरी
मास्क वापरा तरी
पाळा सुरक्षित अंतर
असाच करा कोरोना लसीचा जागर
आली आलीया कोरोना लस
जी देईल तुम्हा सुरक्षा खास ||४||
