कोणती जखम ठसठसते...
कोणती जखम ठसठसते...
धगधगत्या निखाऱ्यावर काळीज जळते ,
का? कुणास ठाऊस कोणती जखम ठसठसते ...
पापण्यात पूर साठून काठ ओलांडू पाहते ,
थरथरत्या ओठांवरही हूंदका दाटून येते ...
असंख्य वार स्पंदनावर त्यांचाही ठेका चुकते ,
दुःख ऐवढे दिले मन टाहो फोडते ...
ऐकू नये कोणी किती जोरानी हसते ,
मुखवट्याने जखमांचे दाह लपवते ...
खोल डोळ्यांच्या डोहात भरती येते ,
चंद्राला काय? त्याचे ओहटी भरतीने कुठे भिजते ...
मनाच्या गाभाऱ्यात जळणारी ज्योत विझते,
आता ना आराधना उपासना तुझ्यावरचा विश्वास उडते...
