कोणापासून काय घ्यावे
कोणापासून काय घ्यावे
१. चिमणी पासून घ्यावी तिची उद्यमता ,
कुटुंबासाठी , पिल्लांसाठी घातलेली धडपड !
२. कुहू - कूहू करणारी कोकिळा मधुर आवाजाची सम्राज्ञी ,
देवून जाते आपणाला सुरेल्पणाचा धडा !
३. मोराची दिमाखदार चाल आणि
सुंदर पिसारा फुलवून दुसऱ्यांना प्रफुल्लित करायची वृत्ति !
४ . घारीची उंच भरारी व उंचावरून ,
सावजावर असलेली अचूक नजर !
५. बगळ्यांची शिस्त आणि नभातली सुरेख माळ ,
आणि एकत्र थव्यात राहायची सवय !.
६. गुबगुबीत कापसा सारखा दिसणारा ससा ,
शिकवतो आपल्याला चपळता व चंचलता !
७. बदकाचा वरुन दिसणारा संथपणा ,
तर पाण्यात सतत चालत असणारे पाय !
८. कबुतरा कडून गतिमान विचार क्षमता ,
व दिशाज्ञान आणि वेगवान संदेशवाहक !
९. खारी कडून शिकावे कामात हातभार लावायला,
" आपण आपला खारीचा वाटा उचलायला " !
१०. कुत्र्या कडून घ्यावी समज, प्रामाणिक मित्र ,
नेहमी सतर्क राहून स्वतः ची व दुसऱ्यांची रक्षा करायला !
११. वानराची उडी व हनुमान भक्ती ,
सेतु बंधनात केलेली प्रभू श्रीरामाची मदत !
१२. मधमाशी कडून सतत धडपड करून,
सगळ्यांनी एकत्र मिळून गोळा केलेले मध!
१३. मुंगी दिसते नुसती सर्वात लहान , पण
हत्तीसारखा प्राण्याला पण चावून करते बेजार !
१४. हंसाची अतूट जोडी , व निर आणि क्षिर
यात करता येणारा फरक !
१५. गाय तर आहेच " कामधेनू " , पुज्य आणि पवित्र सोज्वळ जशी सर्वांची आई - माता !
१६. घोरपड, तिचा चिवटपणा व सहनशक्ती ,
भलभल्या योध्यांच्या आली ती खूप कामी !
१७. गरूड पक्ष्याची उंच भरारी , श्रेष्ठत्व , सहनशक्तीची
पराकाष्ठा व पौराणिक काळापासून कमावलेलं महत्त्व!
