कोंब तो उमलला गर्भात
कोंब तो उमलला गर्भात
देऊनिया एकमेंका प्रेम
कोंब तो उमलला गर्भात
निशाणी होती त्यांच्या प्रेमाची
दे सोडून तिला म्हणे जेव्हा
कळी आपल्या काय कामाची
कळवळले मातृ हृदय
नको असे उचलू पाऊल
करेल आपले नाव मोठे
मुलासम मुलगी पणती
कन्या ओझे हे लक्षण खोटे
आज जे जगात मोठे नाव
गर्भातील त्याच कोंबामुळे
तिचा आहे देशा अभिमान
तिच्यामुळेच आहे ही सृष्टी
हे मर्म तू मनी आज जाण
