कोल्हापूर
कोल्हापूर
कोल्हापूरला गेलो तेव्हा
पडत होता खूप पाऊस
तरीही देवीच्या दर्शनाची
मनात होती हौस
रांगेत उभे असताना
पावसाने चांगलेच सतावले
अंग ओले करून
दर्शनासाठी शुद्धच केले
देवीचे ते रूप डोळ्यांत
खूप वेळ साठवले
देवीला पाहून मन
धन्य धन्य झाले
हार, प्रसाद, नारळाने
देवीची भरली ओटी
अपराध आमचे तेवढे
घे तू तुझ्या पोटी
इच्छापूर्तीसाठी घातलं
देवीला साकडं
होऊ देऊ नको
कधी आमचं वाकडं
वेगळेच समाधान घेऊन
निघालो परतीच्या प्रवासाला
मनोमन म्हणत देवी परत
येऊ तुझ्या दर्शनाला
