STORYMIRROR

UMA PATIL

Inspirational

3  

UMA PATIL

Inspirational

कणखर बळीराजा

कणखर बळीराजा

1 min
15.6K


फेरे जन्माचे आम्हाला

नाही कधीही चुकले

अवकाळी पावसात

बघा, नशीब सुकले


शेतकरी झालो आम्ही

काळी माती झाली आई

पिके पेरली शेतात

झाली उगायची घाई


गेले पालटून भाग्य

विपरीत कसे घडले ?

घात पावसाने केला

प्राण कंठातच अडले


लढू संकटांशी आम्ही

जरी अवस्था बिकट

कणखर बळीराजा

मन खंबीर, राकट


कष्ट करून जोमाने

फुले शिवार हिरवे

काळ्या आईच्या कुशीत

गाणे गातात पारवे


बळी पिकवितो मोती

ओल्या घामाच्या धारात

सुगी येताच जवळ

सुख नाचते दारात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational