कणा कणातला राम
कणा कणातला राम
एवढेच मागणे तुझ्याकडे रामा
दे बळ पंखांना, लढण्यासाठी सर्वांना
लढाई आहे परिस्थितीशी
येणारा प्रत्येक क्षण सांभाळण्याची
एवढेच मागणे तुझ्याकडे रामा
दे धारिष्ट्य सगळ्यांना
येणाऱ्या प्रसंगाला नीट सामोरे जाण्याला
सोपे नाही रे हे सगळे
पण तुझीच ही शिकवण जगताला
एवढेच मागणे तुझ्याकडे रामा
दे नीतीमत्तेचे धडे सगळ्यांना
काहीही झाले तरी चारित्र्याला जपण्याचे
एवढेच मागणे तुझ्याकडे रामा
एकीचे बळ दे सगळ्यांना
धर्म,जाती, गरिब, श्रीमंतीचे
कुंपण उघडू दे आता
एवढेच मागणे तुझ्याकडे रामा
दे विशाल मन सगळ्यांना
सामावण्याचा अर्थ कळू दे सगळ्यांना
तुझ्या विश्वाचा पसारा अगाध
होऊ दे एक तारा आम्हाला त्यात
एवढेच मागणे तुझ्याकडे रामा
दे क्षमाशीलता सगळ्यांना
सह्रदयतेचा सागर तू
होऊ दे आम्हाला त्यातला एक थेंब तू
एवढेच मागणे तुझ्याकडे रामा
एकच ध्यास दे सगळ्यांना
सशक्त व आदर्श समाज बनवण्याचा
त्यागाची परिसीमा गाठून
उदाहरण ठेवले पुढे देशाच्या
प्रत्येकातल्या रामाने जागे व्हावे आता
कणाकणातल्या रामाचा जयजयकार व्हावा
