कमळ
कमळ
पहाट उगवली चैतन्य पसरले
रवितेज किरणांनी नभांगण सजले
सप्तस्वरांहित पवनही ताल धरी
चैतन्यात विलोभनीय भासे अवनी
प्रसन्नतेचे लाभलेले वरदान
कमळ चिखलात ही अलगद स्मित करी सुवर्ण मोहक किरणे पसरता रत्ने झळकती जणू हिरव्या पानांवरी
रंगात विविधता,
दिसण्यात कोमलता
अंगी धारण करी "अलिप्तता"
देशाचे राष्ट्रीय फूल, सौंदर्याचे प्रतीक अतिशय सुंदर, दलदलीत तटस्थ असे,
... बघताच .... पवित्रता दिसे .....
दुःख सर्वांनाच
दुःखांना कवटाळून बसायचं नाही
दुःखावर मात करीत लढायचं
चिंतेच्या चिखलातही आनंदाने फुलायचं माणसाने
लाख मोलाची शिकवण देऊन जाते ही कमळ फुले...🙏😊
