कळत नकत
कळत नकत
नुसताच बसलो
नकळत हसलो
प्रेमात फसलो
अलगद तुझ्या......
पाहून तुजला
फुलोरा सजला
चढला माझ्या
मनाचा मजला......
रूपाने तुझ्या
मनात माझ्या
दिलाचा झाला
हा गाजावाजा......
कसेही वागवे
दिवस हे काढावे
रात्रभर जागावे
प्रेमात तुझ्या.....
गालात गोड हसलो
मनात तुझ्या फसलो
रात्र नी रात्र जागलो
विचारात तुझ्या.....
कळतय मला
वर्षाव झाला
प्रेमाचा माझ्या
दिलात तुझ्या
सकळ जनास
दाखवून दिले
दिन ते सुखाचे
तो जवळच आले.

