Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Inspirational

3  

Rakesh More

Inspirational

कला आहे माझ्यात

कला आहे माझ्यात

1 min
293


जीवनाला जबरदस्त कलाटणी देण्याची 

कला आहे माझ्यात 

नशिबाला नवी धाटणी देण्याची 

कला आहे माझ्यात || 0 ||


कोसळून जाईन अपयशाने 

अशात व्यक्तीत मी मोडत नाही 

भूतकाळातील दुःख मी 

वर्तमानकाळात ओढत नाही 

कर्तुत्वाला यशाची वाटणी देण्याची 

कला आहे माझ्यात 

नशिबाला नवी धाटणी देण्याची 

कला आहे माझ्यात || 1 ||


रडत कुढत बसणं हे 

मला कधीच जमत नाही 

राग द्वेष नैराश्य यात 

मन माझं रमत नाही 

चिंता बीजांना कापणी देण्याची 

कला आहे माझ्यात 

नशिबाला नवी धाटणी देण्याची 

कला आहे माझ्यात || 2 ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational