किमया
किमया
काय किमया केली प्रीतीने
तुझ्याच रंगांत,
रंगुन गेले
तुझ्या स्पर्शाने बहरून गेले !!!
नजर तुझ्या अंत:करणाचा
वेध घेते
माझे मीच स्वत:ला कुठेतरी
लपवून घेते !!!
तुझ्या सहवासाचा सुगंध
फुलवून टाकतों मला
कसे व्यक्त करू मी प्रेम माझे
शब्द सुदधा तोकड़े मला !!!
एक तुच समजून
घेतोस मला
बाकी सगळॆ काव्याला
उणे मला !!!

