STORYMIRROR

Pratibha Vibhute

Drama

3  

Pratibha Vibhute

Drama

खट्याळ मेघराजा

खट्याळ मेघराजा

1 min
366

बरसत आल्या धारा

हा खट्याळ मेघराजा

लखलख सौदामिनी

करी बघा गाजावाजा...१!


अवखळ ,खोडकर

अवचित येई बाई

अवनीला भेटण्याची

मेघराजा होई घाई ...२!


थेंब शुभ्र मोती सम

ओंजळीत अलवार

निसटून क्षणात ते

धरा देई उपहार...३!


सरी वर सरी येता

खळखळ वाहे पाणी

पावसाच्या धारा गाई

सूर संगीत हो गाणी....४!


वसुंधरा ओलीचिंब

गंधाळली प्रीत भारी 

सप्तरंगी इंद्रधनु

उधळती रंग सारी...५!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama