STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

खरं सांगू..!

खरं सांगू..!

1 min
22.5K


खर सांगू

मला काहीच

लिहायचं नव्हतं

रात्र रात्र

जागून काही

साधायच नव्हतं


छंद खुळा

मला गप्प

बसवत नव्हता

डोळ्याला

डोळा अजिबात

लागत नव्हता


म्हणून म्हंटल

ग्रह तारे तोडावे

वेली फुले ढुंडाळावे

शब्द सूर छेडावे

रस अनेक चाखावे

रंग मनसोक्त उधळावे

जल लहरि तरंगावे


आनंदात डुंबावे

दुःखात बुडावे

प्रयत्नात झटावे

यशात नाचावे

सुखात हसावे

आणि थोडे


आळसात लोळावे

साखर झोप घ्यावे

स्वप्न त्यात पहावे

पण छे

इतकं नशीब

कुठलं बलवत्तर

फुलात सुगंतो अत्तर

शाल असते लक्तर


आभाळ होते छप्पर

धरणी होते बिछाना

दाखवतो आईना

नियतीचे प्राक्तन

मोकळा होतो मी

गालात हसून

भाग्य असे सदा

बसता रुसून....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational