खरी सोबत
खरी सोबत
खरी सोबत जीवलगाची,सख्याची, प्राणप्रियाची
आयुष्याच्या दोरीवर संग संग झुलायची
निर्सगाचा हिरवा शालू, सूर्याची धगधगती लाली, ओहोळाचा खळखळाट आणी चिमण्या पाखरांची किलबिल ओटीत भरण्याची
शब्दसुमनांना उधळत जीवनाच्या वेलीवर सुंदर माळ गुंफन्याची
विश्वासाच्या जोडीनं प्रेमाची चादर पसरायची
सुख- दुःखात सोबतीने प्रसंगांना तोंड द्यायची
समंजसपणाचं गाठोडं बांधून जीवनाची वाट सरसर चालायची
घराच्या घरपणाला आणि कुटुंबाच्या रांझनाला सुखी करण्याची
शंकेकुशंकेचं जोखड बाजूला सारून
समाधानाची शिदोरी बांधायची
इंद्रधनुष्याचे सप्तरंग घेऊन जीवनात रंग भरण्याची
वाऱ्यासंगे मोकाट सुटून, पावसात भिजण्याची
उन्हाळ्यातही बहरतो गुलमोहर
कला ही संकटांना सामोरं जाण्याची
वसंताची पानगळी आणि रिमझिम मृगाच्या पावसाची
व्यथा आणि वेदनेचं झू झुगारून वसंतफुलोरा फुलवण्याची

