खरच का
खरच का


कुठल्या नात्याचे सुख हे
सुखाने सुखी आहे
दुःखाच्या झालरी विना खरच का?
प्रत्येकाचे जीवन मखमली आहे..!
कोणत्या नात्याचे रहस्य सर्वांसमोर खुले आहे
भीतीच्या पाठराखीविना
खरच का? जीवन जगणे मजेशीर आहे..!
कुठल्या नात्याचे हास्य रोज खरे आहे नजरेस पडणाऱ्या दुःखापेक्षा खरच का?
मनात दडलेले दुःख सौंदर्यपूर्ण आहे..!
कोणत्या नात्याचे बंधन पूर्णपणे बांधलेले आहे बंधनात बांधल्याविना खरच का ?
प्रत्येक जण स्वतःसोबत प्रामाणिक आहे..!
कोणत्या नात्याचे प्रश्न रोजच मिटलेले आहेत मनाला पडलेल्या प्रश्नाविना खरच का?
जन्म -मृत्यूचे खरे उत्तर शोधण्यात सार्थकता आहे..!