STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

खरा सूर्य..

खरा सूर्य..

1 min
201

अज्ञानाचा अंधार नाही सूर्याने दूर झाला

म्हणूनच माझा हा भिम जन्मा आला .

त्याच्याच ज्ञानप्रकाशाने उजळल्या दाहीदिशा

केले स्वंयप्रकाशित आम्हा, दूर झाली दशा.

वाघिणीचे दूध आम्हा भिमानेच पाजले

गुरगुरणारे वाघ इथे हे आज निपजले .

अस्पृश्यता केली दूर, माणूस झालो आम्ही

नव्हता वाली कोणी सारी भिमाचीच करणी.

दिला धम्म, न्याय, हक्क सारच भिमाने

उद्धरिले आम्हा झाले या जीवनाचे सोने.

जगात मोठी क्रांती केली भिमानेच खरी

अरे खरा सूर्य अवतरला हा या भूवरी .

त्या भिमसूर्याने साराच अंधार हा गिळला

अंधार झाला दूर आम्हा प्रकाश मिळला .

या खऱ्या सूर्यानेच सारे हे जग उजळगले

न् आम्हासाठी झाले खुले आभाळ हे निळे.

नाही जगी तोड त्यांच्या या महान कार्याला

अन् कोटी कोटी प्रणाम त्या खऱ्या सूर्याला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational