खरा कलावंत
खरा कलावंत
कलावंत असे साधक
त्याच्या इच्छित कलेचा
कलेपायी सर्वस्वचि
साधण्यासी अचूकता (1)
नसे आकर्षण त्याला
बाह्यजगातील भारी
नसे मोह धनलोभ
लक्ष नित्य कलेवरी (2)
तन मन धन देई
गुरुसेवा मनोभावे
ज्ञानप्राप्तीसाठी नित्य
यत्न तो देव जाणे (3)
कधी न साधना सोडी
नित्य ज्ञानप्राप्ती नवी
पूर्णत्वाला कला नाही
असे मनास बजावी (4)
वारा न अहंकाराचा
नसे गर्वाचीही बाधा
कलावंत नीतीवंत
असे विनम्रचि सदा (5)
