STORYMIRROR

Kishor Zote

Abstract

3  

Kishor Zote

Abstract

खेळ सारा ( अभंग रचना )

खेळ सारा ( अभंग रचना )

1 min
394

होळीका जाळणे | लाकडी सरण ।

संस्कृती रक्षण | कसे बरे ? ॥ १ ॥


खरे खोटे सारे । संस्कृती भेसळ ।

डोळ्यात मुसळ । दिसेनाच ॥ २ ॥


अज्ञान अडाणी । फायदा कोणाचा ।

बाजार धर्माचा । मांडीयला ॥ ३ ॥


करोणीया राख | उत्सव कशाचा ? ।

कोणा मारण्याचा । देशभर ॥ ४ ॥


रंग उधळण । दुसऱ्या दिवशी ।

पटे ना मनाशी । खेळ सारा ॥ ५ ॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract