STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

खेळ नशिबाचे

खेळ नशिबाचे

1 min
184

खेळ नशिबाचे

सर्वांना अज्ञात

उद्या काय होई

नसे कुणा ज्ञात


राजपुत्र दोघे

लवकुश वनी

दुर्दैवाने हाती

मातीची खेळणी


सीता राजकन्या

परि वनवासी

रावण पळवी

तिजला लंकेसी


त्याग करी तिचा

पती रामचंद्र

तशात गर्भिणी

सुखा अर्धचंद्र


काल गप्पागोष्टी 

करी घरधनी

आवेग झटका

दुर्दैव जीवनी


नाही भरवसा

कशाचा जीवनी

मनःशांतीपायी

स्मरा देव मनी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract