खेळ आमुचा देश आमुचा
खेळ आमुचा देश आमुचा
भारतीय खेळगडी
खेळतात समर्पूनी
पराकाष्ठा प्रयत्नांची
देशा सर्वस्व अर्पूनी (1)
क्रिकेटचे वेड खास
बाल आणि तरुणांना
उत्साही चाहते जमा
प्रोत्साहन खेळाडूंना (2)
राष्ट्रशान वाढविण्यासी
कसूनी करती सरावाते
सोडूनीया घरच्यांसी
खेळ यांचा जीवेभावे (3)
करंडक प्राप्त होता
आम जनता आनंदी!!
कौतुक त्यांचे करण्या
स्वागतोत्सुक पुढती (4)
असे चाहते उत्साही
असे खेळाडू कसबी
भाग्य भारतमातेचे
शान उंच विश्वामधी (5)
