खेड्यांकडे चला
खेड्यांकडे चला
नवीन वाट जीवनाची मिळवू या
प्रदूषणरहित आयुष्य जगू या
सापडू या नवीन सांस्कृतिक वैविध्य
सांधू या सुख आणि दुःखाचा मध्य
शहरी जंगल वाढत आहे सर्वत्र
शांतता नांदते, येथेच मात्र
शोधू या आरोग्याचा मंत्र
जगण्याची मिळेल दिशा, नवे तंत्र
संदेश देऊ या सगळ्यांनाच भला
गांधीजी सांगुनी गेले, खेड्याकडे चला
