खडतर वाट
खडतर वाट


ही वाट खडतर तरी
सहवास तुझा हवाहवा
किती ही असो वेदना
तुच त्यावर जालिम दवा
तूझ्या सोबतीने सुटतात
प्रश्न मनात रखडलेले
बोलक्या तुझ्या डोळ्यांनी
निसटतात धागे गुंतलेले
आयुष्य सुखमय करताना
धडपडतोस जिवापाड
आनंदाने बहरेल घरकुल
पुरवशील पाखरांचे लाड
वाट असो वेडीवाकडी
वळणांची कशाला चिंता
नव्या अनुभवातून येते
विश्व सारे जिंकता