STORYMIRROR

Vasudha Naik

Children

3.4  

Vasudha Naik

Children

खारुताई

खारुताई

1 min
16K



खार बाई खार

गोंडस फार

शेपूट तिचे झुपकेदार


झाडावरून पळते सरसर

दिसते कशी पिटुकली फार

लपते मस्त झाडावर


खिडकीतून आमच्या डोकावते

आदिला माझ्या वाकुल्या दाखवते

टाकलेला खाऊ करते फस्त

झाडावरच मग राहते मजेत मस्त....


खारूताई आमची लाडकी

वाट पाहते ती उघडायची खिडकी

खिडकी उघडताच होते आनंदी

फिरते मग झाडावरच स्वच्छंदी




साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children