Priti Dabade

Romance Others


3  

Priti Dabade

Romance Others


कधी तू

कधी तू

1 min 145 1 min 145

कधी तू आकाशातील चमकणारा तारा

तर कधी मायेचा वाहणारा झरा


कधी तू सागराची उसळणारी लाट

कधी वेगळाच असतो तुझा थाट


कधी तू मंथरलेली रात्र

तर कधी भासतेच भन्नाट पात्र


कधी तू फुलातील मकरंद

कधी तू आंबट गोड करवंद


कधी तू मोहक प्रेमाचा स्पर्श

तुला पाहताच होतो मनास हर्ष


कधी तू वाटतेस नवरी हसरी

मला पाहताच होतेस कावरीबावरी


कधी तू खेळतेस लपंडाव

मंत्रमुग्ध करी तुझे हावभाव


कधी तू होतेस थोडी भावूक

कधी धारदार शब्दांचे चाबूक


कधी तू होतेस थोडी हट्टी

घोर लावी जीवा तुझी कट्टी


Rate this content
Log in

More marathi poem from Priti Dabade

Similar marathi poem from Romance