STORYMIRROR

Murari Deshpande

Inspirational

4  

Murari Deshpande

Inspirational

कधी थंडीचा कडाका

कधी थंडीचा कडाका

1 min
477

कधी थंडीचा कडाका कधी उन करी जाळ

कधी महापूर येता हाती उरे जपमाळ

कधी भूकंपाचे भय कधी सुनामी उसळे

कधी ढगफुटी होता सारे आकाश कोसळे


कधी दरड कोसळे कधी धुळीचे ते लोट

त्याचे घेता घेता नाव किती मिटती रे ओठ

झाली प्रगती प्रगती तरी उकलेना गूढ

किती उंच आहे विश्व आणि खोल किती बूड


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational