कधी पालवी कधी पानगळ
कधी पालवी कधी पानगळ
जीवनाच्या ऋतुचक्रामधे
सुख-दुःख येते पालटूनी
प्राक्तनापरि ललाटरेषा
सुख-दुःख लाभे तयातूनी
कुणी दुःखी त्यातच हसतो
दुःखी जनांचे डोळे पुसतो
आनंदी हसण्यात रमतो
जगताचा विसर पडतो
ऋतुचक्र चालूच असते
शिशिरानंतर ये वसंत
कधी पालवी कधी पानगळ
झाडांना कधी नसे उसंत
कधी बहर कधी शिशिर
हे तर चक्रच झाडांसाठी
पानगळी नंतर बहर
जाण झाडाला नित्यासाठी
दुःखानंतर येईल सुख
जाण मनुजा निसर्गातूनी
मन ठेवावे शांत नेहमी
सुख ये आशाकिरणांतूनी
