कबूतर
कबूतर
गुबगुबीत अंग, भिन्न रंग
स्वभाव शांत अन्
रूप हे देखणं....
फिरतो कधी घराच्या छतावर
कधी रानावनात
आनंद मिळतो जेव्हा
असतो गगनात
उडण्याची अंगी प्रचंड जिद्द
नाही होत कधी निराश
करतो पार प्रत्येक सरहद्द
"शांतीचे प्रतीक" प्राचीनकाळी
संदेशवहनाचे होते साधन
अंगी कधीतरी शांतता बाळगावी
क्रोधावर मिळवावा विजय
प्रेमाने लोकांच्या
मनावर राज्य करावे
हाच असे कबुतराचा संदेश
