कौतुक
कौतुक
कौतुक किती करून घेशील
उगाचच ढगांना बाजूस सारून
आम्ही पुरते घायाळ होतो
नित्य तुझ्यावरी मरून...
लोभस रुपडे तुझे सायंकाळचे
किती प्रयत्न केलातरी टिपता येत नाही
आणि मोह तुला डोळ्यात साठवण्याचा
काही केल्या मनातून हटत नाही...
पण आज मात्र मी संकल्पच केलाय
उद्या तुझ्या कडे पहायचे पण नाही
आणि शांत बसून एके ठिकाणी
तुला मनोमनी आठवायचे पण नाही....
कदाचित तू म्हणशील असे कारे?
माझ्या कडून काही चुकले कारे ?
काय म्हणायचे ते म्हण हवे तर
पण मला आता काही फरक पडत नाही
कारण मागणेच काही बाबा उरले नाही....
जे जे दिलेस ते खूप दिलेस
माझ्या साठी हवे ते केलेस
आता संध्यासमयी सांग काय इच्छा असणार?
मी काय मागणार आणि तू काय देणार...?
