काय फरक पडतो....!
काय फरक पडतो....!
वावराच्या धुऱ्यावरील
झाडाच्या फांदीवर
लांबसडक दोरीचा
लटकलेला फास ....
अन
त्या फासात दिसणारा
आपल्या बापाचा चेहरा
पाहणाऱ्या त्याच मुलांच्या डोळ्यांनी
बापाच्या खांद्यावर बसून
धो धो वाहणाऱ्या
नदीचा पूर पाहून
आनंदाने टाळ्या पिटल्या
तर काय फरक पडतो ....
फक्त अन फक्त
गळफासांच दोर बघणाऱ्या
त्या डोळ्यांनी दुथडी भरून
वाहणारी नदी बघितली ,,,,
अन, नेहमीच गळफास बघून
अश्रूंचे पाट वाहणाऱ्या डोळ्यांनी
धो धो पडणाऱ्या पाऊसधारात
उद्याचा सूर्य बघितला
तर काय फरक पडतो ....!!!!
