STORYMIRROR

Arun V Deshpande

Inspirational

3  

Arun V Deshpande

Inspirational

काय नि किती

काय नि किती

1 min
290

जाऊ द्या गर्दीत पुढे, घाई ज्याला

पायवाट आपल्याला छान किती ।।

कसे होईल? नकोच मनात भीती 

भले असो गर्दी चांदण्याची किती ।।


होतात खलबते निघतात गलबते

ठरते कुणा बुडवायचे कधी किती ।।

व्यासपीठावर ते ओळखीचे सारे

खाली येताच अंतर ठेवती किती ।।


नाही खात्री नाही शाश्वती कशाची

ना ठावे मनुजा, तो जगणार किती ।।

नको देऊ नशीबास दूषण उगी

काही न करता रडतोस तू किती ।।


टाकता पाऊल जाती पुढे पुढे

न माघार मनात जिद्द ती किती ।।

ना तू एकटा, अनेक ते भेटती

बघ मागे जरा, खूप सारे दिसती ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational