काय करू
काय करू
काय करू असं
की तूला विश्वास वाटेल
तुझ्या संशयाचा सागर
क्षणार्धात आटेल || 0 ||
प्रेम काय असतं ते
जाणून तरी घे
स्वतः जरा माझ्यासोबत
स्वर्गात या ने
प्रेमाची मजा चाखून
स्वर्ग मी गाठेल
तुझ्या संशयाचा सागर
क्षणार्धात आटेल || 1 ||
अजून तुझी गाठ
प्रेमाशी पडली नाही
ही गोड कहाणी
अजून घडली नाही
प्रेम माझं तुझ्या
संशयाला छाटेल
तुझ्या संशयाचा सागर
क्षणार्धात आटेल || 2 ||