काय असतो त्याग
काय असतो त्याग
काय असतो त्याग
कळीला कळतो फुलताना
मिटलेल्या पाकळ्या
फुल होऊन बहरताना
काय असते हुरहूर
फुलांना कळते तुटताना
फुललेल्या पाकळ्या
वेलीपासून दूर होताना
काय असतो अर्थ
त्याला कळतो देताना
स्वीकारलेल फुलं
हृदयात पुन्हा फुलताना
