कावळेदादा
कावळेदादा
कावळेदादा कावळेदादा
आंघोळ तुम्ही करा एकदा
आहात तुम्ही खूप काळे
दिसता तुम्ही अगदी बावळे
आंघोळीचा तुम्हाला का बर तिटकारा
पाण्याने तुमचा होतो का कोंडमारा
काळा रंग तुमचा केंव्हा बरे जाणार
आळशी स्वभाव नाही का बदलणार
म्हणून म्हणते कावळेदादा
आंघोळीचा विचार करा आता एकदा
