Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Tragedy Inspirational

4  

Chandan Pawar

Tragedy Inspirational

काळरात्र..

काळरात्र..

1 min
289


आठवे ती काळरात्र आई

जेव्हा जन्मले तुझ्या पोटी;

"मुलगी झाली" ऐकताच

सर्वांच्या कपाळी आठी.


त्या अबोल मुक्या क्षणी

थांबली माझी जीवननौका;

अजाण होते तरी जाणते तुला

मुलगा हवा होता, नाही का?


कापडात गुंडाळले रडता रडता

काही शब्द पडले कानी;

कुठे नेलं ठाऊक नाही

गात होती फक्त रातराणी.


आई, उघड्यावर फेकले मला

चुकला नाही काळजाचा ठोका?

दुनिया पाहण्यापूर्वीच मला

नियतीने दिला धोका.


भुकेने व्याकुळ झाले मी

ओरडून -रडून थकले- दमले;

कचरापेटीतील घाणीत

श्वास माझे गुदमरले.


आई, मुलगा होत नसेल

तर असं खचायचं नसतं;

निरागस स्त्रीभ्रूण-अर्भक

मारून फेकायचं नसतं.


'आई-बाबा' म्हणून हाक

मारण्याची इच्छा आहे खूप;

मोठी होऊन मीसुद्धा

बदलेल या जगाचे रूप.


अनाथांची माऊली जगतवंद्य

सिंधुताईंचा घ्यावा आदर्श;

लेक वाचवून आणि शिकवून

करू या मानवतेला स्पर्श.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy