काळोखात देखील
काळोखात देखील
काळोखातही फिरण्याची
मजा काही वेगळीच असते,
अनुभवता येते
भिती म्हणजे नक्की काय असते
कधी तरी काळोखातही
मनसोक्त फिरुन घ्यावे,
नीशाचरांचे जीवन
अगदीच जवळून पहावे
काळोखात राहून घ्या समजून
महत्त्व डोळस असल्याचे,
अन अनुभवता येते जीवन
त्या आंधळ्या जीवांचे
काळोखात राहून देखील
प्रकाशाची प्रचीती घेता येते,
अन काळोखावर मात करून
प्रकाशमान जीवन जगता येते
