काळ आईपणाचा...
काळ आईपणाचा...
काळ सुवर्ण हा होय
बीज रूजता उदरी
जन्म सार्थकी लागतो
येता मातृत्व पदरी
स्वर्गसुख ती चाहूल
उठती हर्ष लहरी
दोन जीवांच्या नात्याची
असे वीण ही गहरी
दुःख वेदनांच्या कळा
तिला झाला त्रास जरी
पावलांनी इवल्याश्या
गोकुळ नांदेल घरी
तृप्ती ओसंडून वाहे
पाजताना दुग्धसरी
आईपण नवा जन्म
असे हीच वाणी खरी
