STORYMIRROR

Prachi Kulkarni

Inspirational

3  

Prachi Kulkarni

Inspirational

काहूर

काहूर

1 min
173

आकाशातील धूसर होत जाणार क्षितिज

अन् या भविष्य पुसलेल्या वाटा

समुद्रात अखंड फुटणाऱ्या लाटा

हे विझत गेलेले दिवे...


या उदासाचा साज ल्यावा ,

मळलेल्या हातांनी

तर अंतरात काहूर माजवलय ,

भिजलेल्या डोळ्यांनी...


सुसाट वाऱ्यावर भिरभिरणारे शब्द, 

थरथरुन परत फिरतात

अर्थातून निसटणारे त्यांचे भावार्थ

कसेबसे कागदावर उतरतात....


किती सावरावं मी मनाला

ते अनंतात भरकटत जातेय

किती साठवावं आभाळ

ते अखेर मातीतच विसावतंय


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational