STORYMIRROR

Gaurav Daware

Abstract

3  

Gaurav Daware

Abstract

का बर सुचला ?

का बर सुचला ?

1 min
236

आज मला नवा शब्दच सुचला

बघता बघता मनात उतरला 

शब्दकोषात न अर्थ मिळाला 

काय अर्थ लावू त्याला.......


मित्रानं शब्दाच हसू उडवल

त्याच्याही न मनात रुचल

पण त्याला कदाचित कळलं 

कारण त्याच्याही चेहऱ्यावर हसू उतरलं .....


मैत्रिणीला जेव्हा शब्द सांगितला 

तिनेही मात्र हसू आवरलं 

तुज्या सारख्या मुर्खाला 

असं कस रे, का बर सुचलं?


 आता मात्र थट्टा होई 

अपमान होतोय ठायी ठायी 

आता नक्की एक पाही 

शब्द कवितेत लिहायचा नायी....

 

शब्द नव्हता मोठा फार 

पण त्याचा अर्थ बेकार 

उगीच त्याचा करून संचार 

खावा लागेल मोठा मार.......


म्हणून तो शब्द टाळला 

मात्र लिहायचा होता मला 

काय करू तो मनात राहिला 

हळू हळू विसर पडत गेला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract