जय गजानन
जय गजानन
आले देव गजानन
हर्ष दाटे भक्तांमनी
विद्या कला अधिपती
स्वागतास मनोमनी (१)
प्रिय बाप्पा दुर्वाजुडी
गंध सुखवी फुलांचा
उदबत्ती सुगंधाचा
दरवळ मोदकांचा (२)
तुज वंदू कार्यारंभी
कार्य निर्विघ्न सिद्धीस
मान तुला अधिदेवा
तुझे महात्म्य सर्वांस (३)
दोन वर्षे कोरोनाने
कहरच मांडियला
किती निष्पाप जीवांना
त्याने लावले वाटेला (४)
आता झडकरी यावे
कोरोनासी हटवावे
करी भक्तांचे रक्षण
रोगशत्रू निर्दाळावे (५)
यावे पुढल्या वर्षाला
यावे थाटामाटामधे
छान गणेशोत्सवाची
आस दाटे मनामधे (६)
