STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

4  

दिपमाला अहिरे

Inspirational

जरा विसावू या वळणावर

जरा विसावू या वळणावर

1 min
309

चालत असता आयुष्याची नित्य रोजची वाट

कधी दिसता हिरवळ, कधी समुद्र निळाक्षार

वाट वाकडी करून वाटते जरा विसावु या वळणावर!


खुप गेले अनुभव चांगले आणि वाईट

जरा विराम देऊनी शहाणपणाच्या जगण्यावर

वाटते मनाला जरा विसावू या वळणावर!!


वाट चालुनी बरीच मोठी तरीही बाकी असतो गाठायचा पल्ला

एका ठराविक टप्प्यावरती मिळण्यासाठी थोडा उसासा

नजर पोहचावी क्षितीजावर म्हणुन कधी तरी वाटते

जरा विसावु या वळणावर !!


आयुष्याच्या कागद कोरा भरण्यासाठी रोजच धावपळ

रहाटगाड्यातुन निवांत घेऊन कधीतरी काढावा पळ

एकांताने जगण्यासाठी जरा विसावू या वळणावर!!


धागे दोरे,नाते आप्त जपता जपता होते दमछाक

कधीतरी ऐकावी आपल्याही हृदयाची हाक

जपावे लागते त्यालाही आपलेपण जपण्यासाठी

या साऱ्या वलयांतुन बाहेर पडून जरा विसावू या वळणावर!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational