STORYMIRROR

Namita Dhiraj Tandel

Inspirational

3  

Namita Dhiraj Tandel

Inspirational

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले

1 min
327

अस्पृश्याचे हाल पाहुनी, 

ज्योतिबांच्या काळजात ठिणगी पडली..

जाती भेदीच्या अन्यायाला,

मनाच्या वणव्याने पेट घेतली..


ज्योतिबांची धगधग पाहुनी, 

सावित्रीबाईंनी व्यथा जाणली..

क्रांतीच्या वणव्यास लढा दयायला,

समाज सुधारकांची मशाल हाती घेतली..


स्त्री जातीचा अन्याय पाहुनी, 

शिक्षण उपक्रमांची मोहीम राबवली..

येता जाता शेण व दगडाचा मारा शोषला, तरीही तेवत्या ज्ञान ज्योतीला हातात घेतली..


बालहत्या अन् विधवांचे अत्याचार पाहुुनी,

सत्यशोधक समाज कार्याची अक्षता वाहिली..

विचारांची जोड देताना साहित्याला,

"काव्य फुले"व"बावनकशी सुबोध रत्नाकर" काव्यसंग्रहानी भरारी घेतली..


समाज सुधारक सावित्रीबाईं,

स्त्री जातीचा उद्धार करण्यासाठी जन्मली..

पहिली महिला मुख्याध्यापिका आली उदयाला,

पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational