जननी
जननी
उपदेशाचे डोस ऐकून तुझे
चिडचिड होते कधीकधी माझी
अगं,झाल्यावर मोठी मी
ध्यानात ठेवेन शिकवण तुझी
संस्काराची तू दिलेली पुंजी
जपेन मी आयुष्यभर
असेल माझ्या प्रत्येक कृतीत
तुझ्या शिकवणीचा वापर
तुझे स्वयंपाकातील बारकावे
तुझी सवय स्वच्छतेची
आचरणात आणेन शिदोरी
निगा राखत सर्वांची
किती कष्ट उपसतेस
नुसतीच राबतेस आमच्यासाठी
वेळच का काढत नाहीस
तू कधी स्वतःसाठी
मोठे झालो सारे आम्ही
जप स्वतःला थोडे आता तरी
छंद जप, मनोरंजन कर
रमव स्वतःला स्वतःत थोडे तरी
दुखलं खुपलं तुझं कुठे
हाक मार प्रेमाने मला
धावत येईन लगेच
आई जपायला तुला
