जंगलातली शाळा
जंगलातली शाळा
एक दिवस झाले सगळे, प्राणी पक्षी गोळा.....
सर्वांनी मिळून भरवली , जंगलात मग शाळा.....
पहिला तास सुरू झाला ,कोकिळा ताईच्या गायनाने...
पोहण्याचे धडे दिले मग , हंस आणि बदक दादाने.....
कवायत शिकवली छान, मग हत्ती दादाने....
घर बांधायची ट्रेनिंग, दिली सुगरण ताईने....
बोलायला शब्द, शिकवले पोपट दादाने....
उजळणी घेतली ,मस्त मग चिऊताईने......
शिकता - शिकता ,मग झाली मधली सुट्टी.....
डबे खाता- खाता, झाली सगळ्यांची गट्टी.....
झाडावर चढण्याचे धडे, अस्वल लागलं देऊ....
माकडाने आणला होता, सगळ्यांसाठी खाऊ....
पळण्याचे धडे दिले, हरीण आणि चित्त्याने....
नाचण्याचे वर्ग मात्र, घेतले लाडक्या मोराने....
धूर्तपणा शिकवला मग, लांडगा आणि कोल्हा यांनी.....
घरचा अभ्यास दिला, कोंबडे आणि कावळे काकांनी....
अचानक मग, वाघ आणि सिंह काका आले....
त्यांना पाहून , सगळेच मग घाबरून पळाले....
अशी होती एक, जंगलातली शाळा......
कशी वाटली तुला, सांग ना रे बाळा......
