जंगल सफारी
जंगल सफारी
एकदा काय गम्मत झाली
शाळेला सुट्टी लागली
मनी आखला बेत
करू जंगलाची खेप
जंगल बुकच्या मोगली सारखी
भेटतील मलाही मित्र काही
चालत चालत भेटला जिराफ
जिराफाची मान केवढी लांब
हळूच केला त्याने शेकहँड
जंगल सफारी मध्ये भेटले
बागडणारे फुलपाखरू
उडत होत फुला फुलावर
अलगद येऊन बसलं माझ्या गालावर
चिव चिव करीत चिमणी आली
चिमणीला मिळाला मोती भारी
मला दाखवत मिरवत गेली
आली आता अस्वल स्वारी
मला वाटे भीती भारी
त्याने दिला मधाचा गोळा
खाऊन मी फस्त केला
जंगल सफारीत गम्मत पुढे
दिसले मला तळे
तळ्यात होते मासे
मला पाहून हसे
गेलो पुढे जरासा
दिसला मला ससा
भिरभिर डोळे फिरवत
पहा कसा पळाला
सफर माझी सुरू होती
तेथे आले वाघोबा
वाघोबाला पाहुन आली घेरी
पळत सुटलो घरच्या घरी
मौज आली मला भारी
अशी घडली जंगल सफारी
