STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

जमली मैफिल

जमली मैफिल

1 min
167

जमली मैफिल

सुगंधी फुलांची

फारच धांदल

उडाली मुलांची


कुणी मागे जुई

कुणा हवी जाई

चमेली, शेवंती

मोगऱ्याची घाई


मुलांना पाहून

गुलाब हसला

कुणास ठाऊक

चाफा का रुसला


सुगंध घेऊन 

रातराणी आली

सारीच मंडळी

सुगंधात न्हाली


दिमाखात आले

झेंडू नि प्राजक्त

सारेच झालेत

त्यावर आरक्त


दिवस संपला

हसत खेळत

रात्र झाल्यावर

सुटले पळत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational