जिरली
जिरली
घाई झाली पळण्याची, अडवलं नाही कोनी.
शर्यतीच काय झालं, वेळ आता उरला नाही.
निर्णय घेतले घाईने, आता परतावा नाही.
आयुष्य सोबत असले, तरी पुन्हा निर्णय नाही काही.
शब्द सुचेना हाथही थांबला, पुर्ण विराम हा कसला.
स्वतः स्वतःवर हसतो आहे, माझा स्वभावच फसला.
रुसनार तर कोणावर, सारे आपलेच आहे.
त्या साऱ्याच्या नजरेत, मी आता पानी पाहे.
थांबवावे आता बरगळा, रसिकही चिडेल.
आणी लिहिण्याची हौस माझी, कायमची जिरेल.
