जिजाऊ
जिजाऊ


नमन करू त्या मातेला
जिच्या पोटी जन्मले शिवबा
जिजाऊ नाव त्या आईचे
जिच्या आशीर्वादाने स्वराज्याचा मिळाला ताबा
सर्वधर्मसमभावाची दिली शिकवण
अंगी होती तिच्या स्फुर्ती
शूरवीरांच्या पराक्रमांचे दिले बाळकडू
होतीच ती एक महान मूर्ती
जाधवांची लेक तर भोसल्यांची सून
धाडसी वृत्तीने राजमातेचा मिळवला मान
प्रजेला सुखी करण्यात होत गुंग
महाराष्ट्राची बनली ती शान